प्रश्न १ .अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .
१ )भूकवचाचे दोन थर आहेत -
उत्तर -खंडीय व महासागरीय कवच
२ )प्रावरण आणि भूकवचात कोणता घटक सामायिक असतो -
उत्तर -मॅग्नेशियम
३)पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणती खनिजद्रव्ये आढळतात ?
उत्तर - घनरूप
४)बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनलेला आहे ?
उत्तर -लोह
५ ) आपण पृथ्वीच्या कोणत्या थरावर राहतो ?
उत्तर - खंडीय कवच
६ )कोणत्या भुकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात ?
उत्तर - प्राथमिक लहरी
प्रश्न २ .चुक की बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा .
१ )पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता वेगवेगळी आहे .
उत्तर -बरोबर
२ )पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे .
उत्तर - चूक
दुरुस्त विधान - पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्य पासून बनलेला आहे .
३ )बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही .
उत्तर - बरोबर
४ )खंडीय कवच सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे .
उत्तर - चूक
दुरुस्त विधान - खंडीय कवच हे सिलिका व अल्युमिनियम यांचे बनले आहे .
प्रश्न ३ . उत्तरे लिहा .
१ )भूकवचाचे दोन भाग कोणते ? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय ?
उत्तर -खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत .जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे .
भूकवचावर ज्याठिकाणी विस्तीर्ण जमीन आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो .भूकवचाच्या ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो .
२) प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात ?
उत्तर - प्रावणाचा वरील भाग अधिक प्रवाही आहे .प्रचंड दाब व उष्णता यांमुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप ज्वालामुखी पर्वत निर्मिती द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात आवरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे पर्यावरणाला दुर्बल आवरण असे म्हणतात .
३)पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे स्पष्ट करा .
उत्तर -पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान व अंतर्गाभ्याचे तापमान फरक असतो या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्या कडून भागाकडे प्रवाह तयार होतो . पृथ्वीच्या परिवलनामुळे या उर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्या प्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते .चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते .
प्रश्न ४ .सुबह आकृत्या काढून नावे द्या .
१) पृथ्वीचे अंतरंग
2)चुबकीय ध्रुव व विषुवृत्त
प्रश्न ५ .भौगोलिक कारणे लिहा .
१)पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळतात .
उत्तर -पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच प्रावरण आणि गावा या प्रमुख तीन थरांत भिन्नता आहे .पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महा सागरी कवच ii)भूकवच व प्रावरण iii )उच्च प्रावरण व निम्न प्रावरण iv)प्रावरण व गाभा v )बाह्यगाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत अशाप्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते .
२)मुलद्रव्याची घनता व अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे .
उत्तर -पृथ्वीच्या भूकवचात व आवरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात त्याचबरोबर पृथ्वीच्या गाभ्यात जास्त घनता असलेली लोक ही मूलद्रव्य आढळतात म्हणजेच मुलद्रव्याची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जाते .
३ )प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखी चे केंद्र आहे
उत्तर - प्रावरणात शंभर किलोमीटर ते दोनशे किलोमीटरचा भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो .प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली निर्माण होतात .या ऊर्जा लहरींचे ऊर्ध्वदिशेने वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व भूकंप व ज्वालामुखी यांसारख्या प्रक्रिया घडतात .
४)भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते .
उत्तर - भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता२.६५ ते२.९०ग्रॅम घसेमी असते .सागर पृष्ठाखालीलअंतरंगाची घनता२.९० ते३.३ ग्रॅम घसेमीअसते.भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही व त्याची जाडी अधिक होते .
५ )चुंबकवरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते .
उत्तर -पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होतेपृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबक आवरणामुळे वातांमधून वाहणारे भारित कण थरात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते .
स्वाध्याय सोडवा 👉 click here
nice
ReplyDeletePost a Comment