प्रश्न १ .योग्य जोड्या लावून साखळी पूर्ण करा . १ ) सिरम -जास्त उंचीवरील -हिमस्फटीक ढग .
२) क्युम्युलोनिम्बस -आकाशात उभा विस्तार - -तरंगणारे ढग .
३)निम्बोस्ट्रेटस - मध्यम उंचीवरील - रिमझिम पाऊस
४)अल्टोक्युम्युलस - मध्यम उंचीवरील ढग - तरंगणारे ढग
प्रश्न २ .कंसामधील योग्य शब्द निवडा व वाक्य पूर्ण करा .
१)हवेची बाष्पधारणक्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते .
२)एका घन मीटर हवेमध्ये किती ग्रॅम आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते .
३)वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते .
४) क्युम्युलोमिम्बस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत .
५ )मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणांभोवती होते .
प्रश्न ३ .फरक स्पष्ट करा .
आर्द्रता
|
ढग
|
हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेला ओलसरपणा म्हणजे
हवेची आर्द्रता होय.
|
वातावरणातील बाष्प
कण हवेतील धूलीकणांभोवती
एकत्र येऊन तयार झालेला समुच्चय म्हणजे ढग होय .
|
हवेतील आर्द्रताअदृश्य स्वरूपात असते
|
ढग दृश्य स्वरूपात असतात
|
सापेक्ष आर्द्रता
|
निरपेक्ष आर्द्रता
|
i )एका विशिष्ट तापमानास एक
घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्यास तापमानाला हवेची बाष्प धारण क्षमता
यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय
.
|
i )एका विशिष्ट
तापमानात एक घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय .
|
ii)सापेक्ष आर्द्रता
% =
निरपेक्ष आर्द्रता
X 100
बाष्पधारण क्षमता
|
ii)निरपेक्ष आर्द्रता =
बाष्पाचे प्रमाण
हवेचे घनफळ
|
व्युम्युलस ढग
|
क्युम्युलो निम्बस ढग
|
i )भूपृष्ठापासून५००
ते६००मीटर उंचावर असणारे व तुलनेने कमी उभा विस्तार असणारे ढग म्हणजे क्युम्युलस ढग होय .
|
i )भूपृष्ठापासून५०० ते६००
मीउंचीवर असणारे व तुलनेने अधिक उभा विस्तार असणारे ढग म्हणजे ' व्युम्युलोनिम्बस ढग 'होय .
|
ii)क्युम्युलस ढग आल्हाददायी
हवेचे निदर्शक असतात .
|
ii) क्युम्युलोनिम्बस ढग
वादळाचे निदर्शक असतात .
|
प्रश्न ४ . प्रश्नांची उत्तरे लिहा .
१)एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते ?
उत्तर -हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी असते .
२ )आर्द्रतेचे मापन कसे केले जाते ?
उत्तर
-एका विशिष्ट तापमानात एक घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील
प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय .सध्या कोणीच नाही निरपेक्ष आद्रतेचे
मापन पुढील सुत्रा द्वारे केले जाते .
निरपेक्ष आर्द्रता = बाष्पाचे प्रमाण
------------------------
हवेचे घनफळ
एका
विशिष्ट तापमानास एक घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्यात तापमानाला
हवेची बाष्प धारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय .
३)सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक
आहेत ?
उत्तर - सांद्रीभवनासाठी सापेक्ष आर्द्रता वाढणे व त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे या गोष्टी आवश्यक आहेत .
४) ढग म्हणजे काय ? ढगांचे प्रकार लिहा .
उत्तर
-हवेतील धुलीकणांमुळे वातावरणात जास्त उंचीवर करणारे जलकण व हिमकण एकत्र
येऊन मोठ्या आकाराचे बनतात यालाच म्हणतात .ढगांचे प्रकार i)जास्त उंचीवरील
ढग ii)मध्यम उंचीवरील ढग iii )कमी उंचीवरील ढग असे प्रकार पडतात .
५)कोण कोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो ?
उत्तर - निम्बोस्ट्रेटस आणि क्युम्युलोनिम्बस प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो .
६)सापेक्ष आर्द्रतेचे ची टक्केवारी कशाशी संबंधित आहे ?
उत्तर
-एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व
व त्यास तापमानाला त्या हवेची बाष्प धारण क्षमता या बाबीशी सापेक्ष
आर्द्रतेचेची टक्केवारी संबंधित आहे .
प्रश्न ५ .भौगोलिक कारणे लिहा .
१) ढग हे आकाशात तरंगतात .
उत्तर
-वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धूलिकणांभोवती
एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात .ढगांतील जलकण व हीमकण अत्यंत सूक्ष्म
असल्याने ते जवळजवळ वजन विरहित असतात त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात .
२)उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो .
उत्तर
-समुद्रसपाटीवर तापमान जास्त असते .तापमान जास्त असल्यास हवेची बाष्प धारण
क्षमता जास्त असते .त्यामुळे समुद्र सपाटीहवेतील आर्द्रता तुलनेने जास्त
असते .
पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर तापमान कमी
असते .तापमान कमी असल्यास हवेची बाष्प धारण शक्ती कमी असते त्यामुळे अशा
ठिकाणी हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते .
३)हवा बाष्पसंपृक्त बनते .
उत्तर
-एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण क्षमता व हवेतील बाष्पाचे प्रमाण
सारखेच होऊ शकते .अशा स्थितीत हवा अतिरिक्त बाष्प धारण करू शकत नाही
.अशाप्रकारे हवा बाष्प संपृक्त बनते .
४ )क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिम्बस ढगांत रूपांतर होते .
उत्तर
-क्युम्युलस ढगांचा पृष्ठभागापासून५०० ते६०० मीउंचीच्या दरम्यान उभा
विस्तार असतो .या ढगांचा उभा विस्तार काही प्रसंगी वाढतो .उभ्या विस्तारात
वाढ झाल्यामुळे क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोमिम्बस ढगांत रूपांतर होते .
प्रश्न ६ .उदाहरण सोडवा .
१)हवेचे
तापमान 30 अंश सेल्सिअस असताना किती प्रश्न धारण क्षमता30.37 ग्रॅम मीअसते
जर निरपेक्ष आर्द्रता17 ग्रॅम प्रति घनमीटर असेल ,तर सापेक्ष आर्द्रता किती
असेल ?
सापेक्ष आर्द्रता =
निरपेक्ष आर्द्रता
= ------------------ X 100
बाष्पधारण क्षमता
18.00
= ------------------ X 100
30.37
1800
= ---------------
30.37
= 59.26 %
२)एक घनमीटर हवेत0अंश सेल्सिअस तापमानावर4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल ?
उत्तर -निरपेक्ष आर्द्रता=
बाष्पाचे प्रमाण
= -------------------
हवेचे घनफळ
4.08
= -------------------
1
=4.08 ग्रॅम / मी3
Post a Comment