प्रश्न १ .दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .
१)स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या लढ्याला       स्वातंत्र्यसमर          हे नाव दिले .

२)रामोशी बांधवांना संघटित करून   उमाजी नाईक      यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले .

३) 1857 च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी         भारतमंत्री          हे पद इंग्लडच्या शासनात निर्माण करण्यात आले .

४)भारतातील संस्थाने     लॉर्ड डलहौसी      या गव्हर्नर जनरल खालसा केली .

प्रश्न २ .पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा .
१)इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला .
उत्तर - इंग्रजांनी1803 मध्ये ओडीशा जिंकून घेतला . येथे असणाऱ्या पाइकांच्या वंशपरंपरागत जमीनी इंग्रजांनी काढून घेतल्या .
मिठाच्या किमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनते प्रमाणे पाईकांचेही जीवनही असह्य झाले म्हणून त्यांनी सशस्त्र उठाव केला .

२)हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला .
उत्तर -  ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या . या बंदुकातील काडतुसांवरील आवरण दातांनी तोडावे लागे .या आवरणाला गाईची व डुकराची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली .गाय ही हिंदूना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिध्द असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यामुळे या सैनिकांत असंतोष निर्माण झाला .

३)भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही .
उत्तर - भारतातील सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रे नव्हती .  भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी इंग्रजां प्रमाणे योग्य वेळ योग्य  डावपेच आखण्यात ते कमी पडले .इंग्रजांकडे असलेली मोठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनांनी भारतीय सैनिकांकडे नव्हते .दळणवळणाच्या साधनांमध्ये इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रजी यशस्वी ठरले 

 .

४) स्वातंत्र्यलढ्याला नंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली .
उत्तर -1857 च्या स्वातंत्र्य लढ्या नंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली . भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली .सर्व जातीचे सैनिक एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती त्यांना वाटत होती .त्यामुळे त्यांनी लष्करी तुकडे यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठाव होणार नाही याची काळजी घेतली .

 

५)इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्यावर जाचक कर बसवले .
उत्तर -आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा इंग्रजांचा हेतू होता त्यासाठी त्यांनी नवीन महसूल पद्धती अमलात आणली .इंग्लंडमध्ये तयार होणारा मालक भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगांवर जाचक कर बसवले या धोरणामुळे भारतीय उद्योग बंद पडून त्यांचा व्यापार भरभराटीस आला .

प्रश्न ३ .पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .

१) 1857 चा स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती ?
उत्तर -  सामाजिकदृष्ट्या विघातक अशी सतीची चाल ,विधवा विवाहास बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली .आपल्या परंपरा , चालीरीती , रूढी यात इंग्रज शासन हस्तक्षेप करीत आहे अशी भारतीय समाजाची धारणा झाली .परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोडून पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ लागला .

२)1857  च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश का आले?
उत्तर - 1857 च्याउठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली .संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही .इंग्रजांनी प्रमाणे उठावाला एकसंध असे नेतृत्व मिळाले
नाही .अनेक संस्थाने इंग्रजांची एकनिष्ठ राहिल्याने उठावकऱ्यांची ताकद कमी पडली .शौर्य असूनही युद्धातील डावपेच आखण्यात उठवकरी कमी पडले .उठावकऱ्यांकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती .इंग्रजांकडे असलेली आर्थिक ताकद अध्यावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठाव पर्यायांकडे अभाव होता .इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांना पेक्षा मोठी होती .

 

३)1857   च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा .
उत्तर -   ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारात विरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषाचा मुळे हा लढा लढला गेला याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली .भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची खात्री होऊन 1858 च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला .बीपी राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना आणिक आश्वासने द्यावी लागली .इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना करून अंतर्गत धोरणांत धोरणात्मक बदल केले .

 

४ )1857 च्यास्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले ?
उत्तर -  भारतीय समाज सामाजिक दृष्ट्या एकसंध होणार नाही याची काळजी घेणे .भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही .भारतीय समाजात जात , धर्म ,वंश , प्रदेश या कारणावरून सतत संघर्ष होतील असे प्रयत्न करणे .भारतीय समाज घटकांचे एकमेकांविषयी मने कलुषित होण्यासाठी 'फोडा व राज्य करा 'हे धोरण सूत्र ठरवले गेले .

 

Post a Comment

Previous Post Next Post