प्रश्न १ .दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

 १)पोर्तुगीज ,       डच        फ्रेंच व ब्रिटीश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले .

२)1802 मध्ये       दुसरा बाजीराव     पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला .

३)जमशेदजी टाटा यांनी    जमशेदपूर    येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी चा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला .

प्रश्न २ .पुढील संकल्पना स्पष्ट करा .
१)मुलकी नोकरशाही -
                      राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली  असते तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात . प्रशासनाच्या सोयीसाठी आपल्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून ' जिल्हाधिकारी 'हा शासनाचा प्रमुख नेमला . नोकरशाही साठी नियम घालून देण्यात आले मुलकी नोकरशाही हा इंग्रजांचा भारतातील प्रशासनाचा महत्त्वाचा घटक व प्रमुख आधारस्तंभ बनला .


२)शेतीचे व्यापारीकरण
                  पूर्वीच्या काळी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणिगावाची गरज भागवण्यासाठी अन्नधान्यच पिकवत असत .इंग्रजी राजवटीत कापूस तंबाखू चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले .अन्नधान्याच्या लागवडी पेक्षा नगदी पिके नफा देणारी पिके होतीया नफा देणाऱ्या नगदी पिकांना हे चे महत्व दिले जाऊ लागले ; त्यालाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात .

३)इंग्रजांची आर्थिक धोरणे -
                     औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रोड झाली या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली . जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसार्‍याची आकारणी निश्चित केली . शेतसारा रोख रक्कम आणि वेळ भरण्याची सक्ती करुन स्वतःचा महसूल वाढवला .नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला .तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर तर भारतातून इंग्लंड ला जाणाऱ्या  मालावर जबरदस्त कर लादले .

प्रश्न ३ .पुढील विधाने सकारण स्पष्ट करा .
१)भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले .
उत्तर - शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशाच्या स्वरूपात देण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा निर्णय सरकारने केला . व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची अडवणूक करून वाजवीपेक्षा कमी दराने खरेदी करी .शेर सारा भरण्यासाठी प्रसंगी जमीन सावकाराकडे गहाण टाकून कर्ज घ्यावे लागेल त्यामुळे इंग्रजांच्या काळात भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले .

२)भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा र्‍हास झाला .
उत्तर - भारतातील इंग्लंडला निर्यात होणार्‍या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे .परंतु इंग्लडमधून भारतात होणार्‍या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे . यात इंग्रजांचा फायदा होत असे .इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते .यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पन्नापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक होत असे .परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योग धंद्यांना टिकाऊ न लागल्यामुळे त्यांचा ऱ्हास झाला .

प्रश्न ४ .पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा .
   

व्यक्ती

कार्ये

लॉर्ड कॉर्नवॉलीस

 

भारतात नोकरशाहीची    निर्मिती केली

लॉर्ड बेंटिंग

सतीबंदीचा कायदा केला

लॉर्ड डलहौसी

दत्तक विधान नामंजूर

करून संस्थाने खालसा केली

विल्यम जोन्स

एशियाटिक सोसायटी ऑफ

बंगाल 'ची स्थापना .


स्वाध्याय सोडवा 👉 click here

Post a Comment

Previous Post Next Post