प्रश्न १ .दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .
१)रामकृष्ण मिशनची स्थापना      स्वामी विवेकानंद     यांनी केली .

२)मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना       सर सय्यद अहमद खान     यांनी केली .

३)डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे      यांनी केली .

प्रश्न २ .पुढील तक्ता पूर्ण करा .

समाजसुधारकाचे नाव

संस्था

वृत्तपत्र/पुस्तक

संस्थेची

कार्ये

राजा राममोहन रॉय

 


ब्राम्हो समाज

संवादकौमुदी

१)सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धतीला विरोध,

2)विधवा आणि स्री शिक्षणाला पाठींबा

3)उच्चनीच भेदभावास विरोध  

स्वामी दयानंद सरस्वती


आर्यसमाज

सत्यार्थ प्रकाश

१)वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य

2)शिक्षण संस्था स्थापन

3 )स्री-पुरुष समानता  

महात्मा फुले


सत्यशोधक ससमाज

ब्राह्मणांचे कसब’, गुलामगिरी,

शेतकऱ्याचा आसूड,

सार्वजनिक सत्यधर्म

१)समतेच्या तत्त्वावर आधारित समाजनिर्मिती

2) बहुजन समाजाच्या शिक्षणाचा व स्त्री -शिक्षणाचा पुरस्कार

3) माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरितींवर   कडक टीका

४)बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन


प्रश्न ३ .पुढील विधाने सकारण स्पष्ट करा . 
१)भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या .
उत्तर - भारतात इंग्रजी शिक्षण सुरु झाले , त्यामुळे नवे विचार , नवीन कल्पना , नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला .पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली .स्वातंत्र्य , समानता , न्याय ,मानवता  लोकशाही मूल्यावर आधारित समाज निर्माण व्हावा असे नवसुशिक्षित मध्यमवर्गाला वाटू लागले .समाजातील अंधश्रद्धा जातिभेद रूढी परंपरा आधी तोच नष्ट झाले पाहिजे याची त्यांना जाणीव झाली या जाणिवेतून सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या .

२)महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला .
उत्तर -समतेच्या तत्त्वावर आधारित समाज निर्मिती झाली पाहिजे असा महात्मा फुले यांचा आग्रह होता . त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले .विधवा स्त्रियांचे केशवपन म्हणजे संपूर्ण केस का
ढून टाकण्याची क्रूर चाल त्या काळात अस्तित्वात होती या रुढीला करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला .

प्रश्न ४ .टिपा लिहा .
१)रामकृष्ण मिशन -
                      हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाज प्रबोधन करणे या उद्देशाने रामकृष्ण मिशनची स्थापना झाली .रामकृष्ण
परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी1897 या संस्थेची स्थापना केली . ही संस्था दुष्काळग्रस्तांना मदत करणे रोगी व दीनदुबळे यांच्यावर औषधोपचार करणे ही सामाजिक कामे आजही करीत आहे .
२)सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा -
उत्तर -       महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले . समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला निंदा नालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले .

महात्मा फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची या कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली . स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढी विरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले .

स्वाध्याय सोडवा 👉CLICK HERE

 

Post a Comment

Previous Post Next Post