प्रश्न १ .योग्य पर्याय निवडा .

१) लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर - उत्तर अटलांटिक

२)पुढील पैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे ?
उत्तर - सोमाली प्रवाह

३ )सागरी प्रवाहाच्या किनारपट्टीच्या प्रदेशात पुढीलपैकी कशावर परिणाम होत नाही ?
उत्तर - भूमीय वारे

४)उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशांत पुढीलपैकी कशाची निर्मिती होते ?
उत्तर - दाट धुके

५)उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्टिका पर्यंत वाहणारे प्रवाह कोणते ?
उत्तर - खोल सागरी प्रवाह

प्रश्न २ .पुढील विधाने तपासून  योग्य विधाने दुरुस्त करा . 
१)सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात .
उत्तर - योग्य

२)खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात .
उत्तर - योग्य

३) पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते .
उत्तर - अयोग्य
दुरुस्त विधान - पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशांत व त्याच प्रमाणे धुळे प्रदेशांतही होते .

४)मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे .
उत्तर - योग्य

५)हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते .
उत्तर - अयोग्य
दुरुस्त विधान - हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते .

६)ब्राझील जवळ सागरी प्रवाह मुळे पाणी उबदार होते .याउलट ,आफ्रिका किनार्‍यालगत पाणी थंड होते .
उत्तर - अयोग्य .
दुरुस्त विधान - ब्राझील जवळ सागरी प्रवाह मुळे पाणी उबदार होते .तसेच ,आफ्रिका किनार्‍यालगत ही पाणी उबदार होते .

प्रश्न ३ .पुढील गोष्टींचा परिणाम सांगा .
१)उष्ण प्रवाहांचा हवामानावरील परिणाम -
उत्तर - ज्या किनारपट्टी जवळून उष्ण सागरी प्रवाह व हातात त्याठिकाणी तापमान वाढते .
ज्या किनारपट्टी जवळून उष्ण सागरी प्रवाह जातात तेथे तुलनेने अधिक पाऊस पडतो .

२) शीत सागरी प्रवाह यांचा हवामाना वरील परिणाम -
उत्तर - ज्या किनारपट्टी जवळून शीतसागरी प्रवाह वाहतात  त्याठिकाणी तापमान घटते .तसेच ज्या किनारपट्टी जवळून शीत सागरी प्रवाह वाहतात तेथे तुलनेने कमी पाऊस पडतो .

३ )शीत प्रवाहांचा हिमनगाच्या हालचालींवरील प्रभाव -
उत्तर -शीत प्रवाहांमुळे हिम नगांची ही सागरी प्रवाहांना अनुसरून हालचाल सुरू होते .शीत प्रवाह मुळे खूप अंतरापर्यंत वाहत जाऊन समुद्राच्या मध्यात येतात व सागरी वाहतुकीत अडथळे व धोके निर्माण होतात .

४)सागरात पुढे आलेल्या भूभागाचा सागरी प्रवाह वरील प्रभाव -
उत्तर -  या भूभागात मुळे सागरी प्रवाह मध्ये अडथळे निर्माण .सागरात पुढे आलेल्या भूभागांमुळे प्रवाहांची दिशा व वेग या घटकांत बदल होतो .

५) उष्ण व शीत  प्रवाहांच्या संगमांचे प्रदेश -
उत्तर - या प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर दाट धुके तयार होतात .या संघटनांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वनस्पती शेवाळ , प्लवंग हे माशांचे खाद्य वाढते व तेथे मासेमारी व्यवसाय भरभराटीस येतो .

६)सागरी प्रवाहांची वहनशक्ती -
उत्तर -सागरी प्रवाहाच्या वहनशक्तीमुळे किनारपट्टीच्या तापमानात व पर्जन्यमानात फरक पडतो . खोल सागरी प्रवाह मुळे पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते .

७)  खोल सागरी प्रवाह -
उत्तर - खोल सागरी प्रवाह मुळे सागराच्या पृष्ठभागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते . खोल सागरी प्रवाह मुळे सागर जलाचे पुनर्वितरण घडून येते .

प्रश्न ४ .खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१)सागर जल गतिशील कशामुळे होते ?
उत्तर -ग्रहीय वाऱ्यामुळे सागरजल गतिशील होते .

२)सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते ?
उत्तर - सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे उत्तर गोलार्धात घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेप्रमाणे आणि दक्षिण गोलार्धात घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेप्रमाणे दिशा मिळते .

३ )खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती ?
उत्तर - महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या घनतेतही तफावत आढळते .
महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमानात तफावत आढळते .
सागराच्या पाण्याच्या तापमानातील व घनता येतील तफावतीमुळे अभिसरण घडुन येते .यालाच उष्णता क्षारता अभिसरण म्हणतात .उष्णता क्षारता अभिसरणाचा मुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात .

४)कॅनडाचा पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात ?
उत्तर -  कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ उन लॅब्राडोर प्रवाह वाहतो .लॅब्राडोर शीत प्रवाहामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळील सागर जलाच्या तापमानात घट होते .सागर जलाच्या तापमानात घट झाल्यामुळे सागरातील पाणी गोटू लागते त्यामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात .

प्रश्न ५ .सागरी प्रवाह यांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या .
१) हंबोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवरील हवामानावर काही परिणाम होत असेल ?
उत्तर - हंबोल्ट हा शीत प्रवाह असल्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर तापमानाचे व पर्जन्याचे प्रमाण कमी राहील .

२)प्रति विषुववृत्तीय प्रवाह कोणत्या महासागरात दिसत नाहीत व का ?
उत्तर -  प्रति विषुववृत्तीय प्रवाह आर्टिक महासागर व दक्षिण महासागरात दिसत नाहीत हे महासागर ध्रुवीय प्रदेशांत असल्यामुळे त्यात व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव तुलनेने कमी असतो परिणामी त्यात प्रति विषुववृत्तीय प्रवाह दिसत नाहीत .

३)उत्तर हिंदी महासागरात कोणता प्रवाह नाहीत व का ?
उत्तर - उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह नाहीत उत्तर हिंदी महासागराचा भाग उष्ण कटिबंधात असल्यामुळे तेथे शीत प्रवाह नाहीत .

४)उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठे आहेत ?
उत्तर - उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ प्रवाह , लॅब्राडोर प्रवाह ,उत्तर पॅसिफिक महासागरात क्युरोशिओ प्रवाह , ओयाशिओ  प्रवाह ,दक्षिण पॅसिफिक महासागरात पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह ,दक्षिण हिंदी महासागरात दक्षिणध्रुवीय प्रवाह इ.प्रवाह आहेत .

 

स्वाध्याय सोडवा👉 click here

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post