प्रश्न १ . योग्य पर्याय निवडा .
१)जमिनीवरून भूरूपाप्रमाणेच सागरात ही जलमग्न भूरूपे आढळतात कारण ..
उत्तर -जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही 
 
२)मानव सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो ?
उत्तर -भूखंडमंच

३)पुढीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे ?
उत्तर - ज्वालामुखीय राख ,लाव्हारस ,मातीचे सूक्ष्म कण

प्रश्न ३ .भौगोलिक कारणे लिहा .
१)सागर तळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे .
उत्तर -सागरतळाशी मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात .  सागर तळात मोठ्या प्रमाणात खनिजे मूलद्रव्य खडक अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात .  खनिजसंपत्ती , प्राणीसंपत्ती , वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इ.अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे .

२)भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे .
उत्तर -भूखंड मंच हा सागरतळाचा उथळ भाग आहे त्यामुळे भूखंडमंच्यापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात . परिणामी भूखंड मंचावर शेवाळ प्लवंग यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते . हे माशांचे खाद्य असते त्यामुळेभूखंडमं चावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात भूखंडाच्या भागात माशांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होते .

३)काही सागरी बेटे ही सागरी पर्वत रांगांची शिखरे असतात .
उत्तर - सागरतळावर हजारो  किमी लांब , रुंद , हजारो मीटर उंचीच्या पर्वत रांगा असतात या पर्वतरांगा  सागर पर्वत रांगा म्हणतात काही ठिकाणी या सागर पर्वतांची शिखरे समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वर येतात अशा ठिकाणी चारही बाजूंना पाणी व मध्यभागी जमीन असे भूरूप तयार होते अशा म्हणतात .

४)खंडान्त उतार ही भूखंडाची सीमारेषा
 मानतात .
उत्तर - भूखंडमंचानंतर खंडान्त उतार सुरू होतो .खंडान्त उताराच्या अधःसीमेनंतर अत्यंत खोल असा सागरी मैदानाचा भाग सुरु होतो म्हणून खंडांत उतारही भूखंडाची सीमारेषा मानतात .

५)मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थाचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक असते .
उत्तर - मानवाकडून होणाऱ्या टाकाऊ पदार्थांच्या विसर्जनामुळे सागरातील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढते . पाण्याच्या प्रदूषणामुळे प्रजातींचे जलचर व सागरी वनस्पती यांच्या विनाशास कारणीभूत ठरते .त्यामुळे मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थाचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक आहे .
प्रश्न ४ .  खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकारांना
योग्य नावे द्या
१)वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील
अति खोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत?
उत्तर- वरील आराखड्यात सागरी गर्ता आणि सागरी पठार
संशोधनास उपयुक्त आहेत.
 
२)कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या
तळ उभारणीस योग्य आहेत?
उत्तर -भूखंडमंच तळ उभारणीस योग्य आहेत.
 
स्वाध्याय सोडवा 👉 click here

 

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post